अध्यक्षपदी डॉ. मुकुंदराव तापकीर, सरचिटणीसपदी विनय खटावकर

मुंबई : सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी डॉ. मुकुंदराव तापकीर आणि सरचिटणीसपदी श्री. विनय खटावकर यांची निवड करण्यात आली. प्रदेशाचे 10 वे अधिवेशन नुकतेच मुंबई येथे पार पडले. त्यामध्ये आगामी तीन वर्षांसाठी नवीन पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांची निवड जाहीर करण्यात आली.

विशेष म्हणजे दोन्ही पदाधिकार्‍यांसह संपूर्ण कार्यकारिणी बिनविरोध निवडून आली आहे. मावळते अध्यक्ष संजय बिर्ला यांनी पदाची सूत्रे डॉ. तापकीर यांच्याकडे सुपूर्द केली आहेत. सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्योतिंद्रभाई मेहता, संरक्षक सतीश मराठे, राष्ट्रीय संघटनप्रमुख विजय देवांगण यांनी नवीन पदाधिकार्‍यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.